भुसावळातील अमृत योजना टप्पा एकचे काम घेणार्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
शिवसेना ठाकरे गटाचे पालिकेत निवेदन ः टप्पा दोनचे काम चांगल्या कंत्राटदाराला द्यावे
Blacklist the contractor undertaking Amrit Yojana Phase I work in Bhusawal भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या अमृत योजनेचे टप्पा एकचे काम अपूर्ण असल्याने शहरवासीयांना टंचाईचे चटके जाणवत आहे. 65 कोटी रुपयांची योजना नऊ वर्षानंतरही कंत्राटदाराला पूर्ण करता आलेली नाही. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून यांची अनामत रक्कम जप्त करावी व महाराष्ट्र शासनाने भुसावळसाठी अमृत टप्पा दोन ही 137 कोटीची योजना मंजूर केल्याने निविदा निघाल्यानंतर ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी हे काम केलेली आहे त्या योजनेचे टेंडर निघालेले आहे अमृत 2 योजना लवकरात सक्षम व दर्जेदार कंत्राटदाराला देण्यात यावे अन्यथा कोट्यवधी रुपयांची ही योजना अपयशी ठरल्यास शहरातील नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
पालिका प्रशासनाला निवेदन
पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांना पदाधिकार्यांनी निवेदन दिले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे, निलेश महाजन, बबलू बर्हाटे, मुकेश गुंजाळ, पप्पू बारसे, दिलीप सुरवाडे, राजू इंगळे, नरेंद्र लोखंडे, रहीम गवळी, अबरार ठाकरे, जितू पाटील, शरद जैस्वाल, पिंटू भोई, सुरज पाटील, बबलू धनगर, शरद जोहरे, रिंकू भोई, शिवसैनिक उपस्थित होते.





