हतनूर धरणाजवळ दोन लाखांचा गुटखा जप्त : सावदा पोलिसांची कारवाई
Gutkha worth two lakh seized near Hatnoor dam : Savada police action सावदा (26 सप्टेंबर 2024) : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हतनूर धरणाजवळ सुमारे दोन लाखांचा गुटखा व सुगंधी तंबाखू सावदा पोलिसांनी जप्त केल्यानंतर गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली. अनिल ओंकार पाटील (40, रा.जळगाव) व रोहित मुकेश बरकले (22, रा.शिवपूर, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. संशयीतांना लुमखेडा शिवारात हतनूर धरणाच्या पाटचारीजवळ पकडले. त्यांच्याकडून दोन लाख 560 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव चौधरी, सुनील कुरकुरे, बबन तडवी आदींच्या पथकाने केली.

