अवैध गौण खनिज वाहतूक करतांना पकडलेल्या वाहनांच्या लिलावातून मिळाला 15 लाखांचा महसूल


यावल (26 सप्टेंबर 2024) : यावल तहसील कार्यालयामध्ये महसूलच्या गस्ती पथकाने विविध भागातून पकडलेल्या वाहनांचा बुधवार. 25 सप्टेंबर रोजी लिलाव केला. सात वाहनांपैकी एका वाहनाचा लिलाव रद्द झाला तर उर्वरी सहा वाहनांपैकी चार वाहन मालकांनी दंड भरल्याने दोन वाहनांचा लिलाव करण्यात आला. या सर्व प्रक्रियेतून प्रशासनाला तब्बल 15 लाख आठ हजार 749 रुपयांचा महसूल मिळाला. दोन वाहनांच्या लिलावात मूल्यांकनापेक्षा 2.45 लाख रुपये अधिकचे प्राप्त झाले.

तांत्रिक अडचणीमुळे एका वाहनाचा लिलाव रखडला
यावल तहसील कार्यालयामध्ये तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करतांना वाहन पकडण्यात आल्यानंतर सात वाहन मालकांनी वेळेत दंड न भरल्याने प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सात वाहनांचे मूल्यांकन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्याकडून काढून मागवले होते व वाहनांचा लिलाव बुधवारी येथील तहसील कार्यालयात ठेवला. लिलावापूर्वी एका वाहनाचा लिलाव तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आला.

उर्वरीत सहा वाहनांच्या लिलाव प्रक्रीयेला सुरू करण्यापुर्वीचं त्यातील चार वाहन मालकांनी दंड अदा केला परिणामी 2 वाहनांचा लिलाव येथे करण्यात आला. तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत निवासी नायब तहसिलदार संतोष विनंते, लपीक सुयोग पाटील, निशा चव्हाण यांनी प्रक्रीया राबवली यात दोन वाहनांच्या लिलावात एकुण 18 जणांनी बोली लावली होती.व शांततेत प्रक्रीया पार पडली या लिलावातुन तसेच दंड अदा केल्याने एकुण प्रक्रीयेत प्रशासनाचे तब्बल 15 लाख 08 हजार 749 रूपये वसुल झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !