यावल शहरात महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
यावल (26 सप्टेंबर 2024) : शहरातील भुसावळ रस्त्यावरील विस्तारीत भागात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोमवारी रात्री महसुलच्या गस्ती पथकाने पकडले. ट्रॅक्टर मालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पंचनामा करीत दंडाची नोटीस देण्यात आली.
कारवाईनंतरही अवैध वाहतूक कायम
यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळाधिकारी सचिन जगताप सह महसूल पथकाने सोमवारी रात्री भुसावळ रस्त्यावरील विस्तारीत भागात विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करतांना पकडण्यात आले. ट्रॅक्टर मालक गणेश भालेराव यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पंचनामा करून ट्रूक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले व त्यांना दंडाची नोटीस देण्यात आली. प्रसंगी तलाठी शरीफ तडवी, संदीप गोसावी, मिलिंद कुरकुरे, उमेश बाभुळकर, कोतवाल सोनूसिंग राजपूतसह आदींची उपस्थिती होती.

