भुसावळातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण : आमदारांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ
Concreting of Road in Ward No. 13 in Bhusawal : Work Commenced in Presence of MLAs भुसावळ (27 सप्टेंबर 2024) :आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून व माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या प्रयत्नातू नशहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत गांधी नगरातील गोटू लाहोटी यांच्या घराजवळील परिसर व सरस्वती नगरातील मुख्य रस्ता व परिसरात काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते कारण्यात आले. श्री रामेश्वर महादेव मंदिर, प्रल्हाद नगर येथे आमदार यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या बॉटनिकल गार्डन कामानिमित्त नागरिकांनी आमदारांचा सहृदय सत्कार केला.
आमदारांचे मानले आभार
लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांतर्फे आमदार यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र बाविस्कर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र (गुड्डू सेठ) अग्रवाल, महिला प्रभाग अध्यक्ष संध्या चंदेल, उ.भा.आघाडी शहराध्यक्ष वेदजी ओझा, अनुसूचित आघाडी अध्यक्ष राहुल तायडे, उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, उपाध्यक्ष नागेश खरारे, सरचिटणीस लाजरस मनी, खजिनदार मनीष पाटील, युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष अंकुश वावरे, बुथप्रमुख किशोर टोके, राजेश चंदन, संजय लाहोटी आदींची उपस्थिती होती.





