अॅड.रोहिणी खडसेंच्या प्रयत्नांना यश : मुक्ताईनगर-बोदवड जुनोनेमार्गे नवीन बसफेरी सुरू
मुक्ताईनगर (27 सप्टेंबर 2024) : बोदवड तालुक्यातील जुनोने ग्रामस्थांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर ते बोदवड, अशी बसफेरी मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड सुरू करण्या बाबत विनंती केली होती. महामंडळाचे जळगाव विभागीय नियंत्रक भगवान जगनोर आणि मुक्ताईनगर आगरप्रमुख यांच्याकडे पत्रव्यवहार आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुक्ताईनगर ते बोदवड बसफेरी मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी, ओझरखेडा, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड सुरू करण्यात आल्याने जुनोने ग्रामस्थांनी अॅड.खडसे यांचे आभार मानले आहेत.
ग्रामस्थांना मोठा दिलासा
बोदवड तालुक्यातील जुनोने व परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचे बोदवड, व मुक्ताईनगर येथे नियमित बाजारासह अन्य शासकीय कामांसाठी येणे-जाणे आहे व भाविक, भक्तांच्या सोयीसाठी मुक्ताईनगर ते बोदवड, मुक्ताईनगर -कोथळी, बोहर्डी, ओझरखेडा, बेलखेड, जुनोनेमार्गे बोदवड अशी बसफेरी सुरू करण्याची जुनोने येथील ग्रामस्थांनी रोहिणी खडसे यांच्याकडे केली होती. संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर ही बस सुरू करण्यात आली आहे. जुनोने येथील ग्रामस्थांनी पहिल्या बसफेरीचे पूजन करून बसच्या चालक आणि वाहक यांचा सत्कार केला तसेच रोहिणी खडसे यांचे आभार व्यक्त केले.

