उत्सवाचे भान राखा : एखादा गुन्हा आयुष्य उद्ध्वस्त करेल ; सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग

शांतता समितीची बैठक


यावल (28 सप्टेंबर 2024) : संवेदनशील जागेवर तरुणांनी नाचण्याचा अट्टाहास धरु नये, उत्सवाचा पुरेपूर आनंद घ्यावा व आपल्या हातून, असे कृत्य होऊ देऊ नका ज्यामुळे आपल्यावर एखादा गुन्हा दाखल होऊन आपले करीयरच उद्ध्वस्त होईल, प्रत्येकाने उत्सवाचे भान ठेवणे आवश्यक आहे, अशा सूचना सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी केल्या. त्या यावल येथे शुक्रवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
पंचायत समितीच्या सभागृहात आगामी दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या होत्या. प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नगरपालिकेचे कक्ष अधीक्षक राजेश गावंडे, विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अशोक लाहोडे, सहा.पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांची उपस्थिती होती.

उत्सवाचे भान राखणे गरजेचे
सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग म्हणाल्या की, उत्सवात प्रत्येकाने भान राखणे गरजेचे आहे. संवेदनशील जागेवर वारंवार परत येऊन तेथे नाचणे योग्य नाही, आपण उत्सव साजरा करत असताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून गैर कृत्य होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मिरवणुकीत कुठे गालबोट लागल्यास गुन्हे दाखल होतात आणि अशा परिस्थितीत तरुणांचे करिअर हे धोक्यात येते. तेव्हा याचे भान प्रत्येक तरुणाने ठेवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. या बैठकीमध्ये शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान, गोपालसिंग पाटील, विजय सराफ, प्रा.मुकेश येवले, शेख असलम शेख नबी, डॉ.निलेश गडे सह मान्यवरांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !