साकेगावातील विवाहितेचा खून : आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी


Murder of married woman in Sakegaon: Accused four days in police custody भुसावळ :  भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे अनैतिक संबंधातील वादानंतर 28 वर्षीय विवाहितेवर चाकूने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सागर रमेश कोळी (रा.साकेगाव) यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची 30) पोलिस कोठडी सुनावली.

असे आहे प्रकरण
साकेगाव येथील भवानी नगरातील रहिवासी विवाहिता सोनाली कोळी हिचे संशयीत सागर कोळीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते व त्यातून झालेल्या वादानंतर गुरुवार, 25 रात्री 11.30 वाजेच्या सुमारास झालेल्या वादाचे पर्यावसान हे थेट विवाहतेवर हल्ल्या तझाले. या प्रकरणी तालुका पोलिसांनी सागर कोळी याला अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी संशयीत सागर यांच्याकडून खूनात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. विनोद कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर कोळीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक निरीक्षक जनार्दन खंडेराव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !