विद्यार्थ्यांनी जीवनात सेवा व्रताचा अंगीकार करावा : प्राचार्य डॉ.रमेश जोशी
भुसावळ (29 सप्टेंबर 2024) : विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा चांगला मंच आहे.व्यक्तित्व विकास व समाज आणि राष्ट्रसेवा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेविषयी सखोल माहिती त्यांनी देत विद्यार्थ्यांनी जीवनात सेवा व्रताचा अंगीकार करावा, असे आवाहन प्राचार्यांनी हिंदी महाविद्यालयात रासे यो उद्बोधन वर्गात केले.
राष्ट्रीय स्थापना दिन उत्साहात
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा व डॉ.विवेक जोशी यांनी एनएसएसच्या माध्यमातून वर्षभर चालणार्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना वृक्षारोपण कार्यक्रम, ब्लड डोनेशन, पाणपोई सेवा, मतदार जनजागृती अभियान, स्वछता अभियान तसेच विशेष शितकालीन शिबिराविषयी व कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती सांगितली.

सूत्रसंचालन प्रा.ज्योती उस्थवाल तर आभार डॉ.विवेक जोशी यांनी मानले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
