भुसावळात आमदारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
भुसावळ (29 सप्टेंबर 2024) : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा प्रभारी खासदार बन्सीलाल गुर्जर व आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गौरव राजेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.
असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
वाघ यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी. अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रशांत पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस रवींद्र दाभाडे, उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे यांनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तव्य पूर्ण पार पाडेल, असे गौरव वाघ म्हणाले.

