मालोद येथील 57 वर्षीय महिलेचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू
यावल (30 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील मालोद गावातील रहिवासी 57 वर्षीय विवाहीतेने काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यावर तिला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मालोद, ता.यावल येथील मंगलाबाई प्रल्हाद सावले (57) या महिलेने आपल्या राहत्या घरी काहीतरी विषारी औषध पिले होते आणि तिला अस्वस्थ वाटू लागले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यावर तातडीने तिला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. जळगाव येथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

