वरणगाव नागेश्वर रेल्वे पूला खालील पाणी न काढल्यास 7 रोजी आंदोलन
प्रवासी संघटनेचे सरचिटणीस योगेश महाजन यांचा इशारा
वरणगाव (01 ऑक्टोबर 2024) : शहराजवळील तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराजवळील रेल्वे पुलाखालील साचलेले पाणी न काढल्यास सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह विद्यार्थी नगरिकांच्या उपस्थित रेल्वे पुलाखाली पाण्यात बसून रासता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवासी संघटनेचे सरचिटणीस योगेश महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला इशारा दिला आहे.
भाविकांसह वाहनधारकांची गैरसोय
वरणगाव शहराजवळील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ बोदवडकडे वरणगावकडे जाणार्या रेल्वे पुलाखाली मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे पाणी साचत आहे. त्या पाण्यामध्ये अनेक विद्यार्थी, शाळेसाठी जा करणारे नागरिक वाहने घेऊन जात असल्ून खड्ड्यांमुळे पाण्यात आपघात होत आहे. तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जाणार्या भाविकांची गर्दी जास्त असल्याने नागरिकांना पाण्यातून चालतांना मोठ-मोठे सर्प त्या पाण्यात आढळतात. लोक घाबरतात तसेच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणार्या नागरिकांची जास्त गर्दी असल्याने त्या पाण्यामुळे नागरिकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही.
तर 7 रोजी आंदोलन
भुसावळ सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या रेल्वे पुलाच्या खालील पाणी काढावे व रस्ता दुरुस्त करावा अन्यथा सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी रेल्वे पुलाच्या खाली पूलाच्या पाण्यामध्ये बसूनच रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवासी संघटनेचे सरचिटणीस योगेश महाजन यांनी यावेळी पाहणी करतांना दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे लाला धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे यांच्यासह भानखेडे माजी सरपंच नरेंद्र देशमुख, एकनाथ मराठे यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते.