यावल वनविभागाकडून 28 हजारांचे सागवान लाकूड जप्त
यावल (02 ऑक्टोबर 2024) : यावल वनविभागाने गोपनीय माहितीवरून मौजे बोरअजंटी या गावाजवळ तपासणी करीत कट साईज सागाचे 22 हजार 863 रुपये किंमतीचे एकूण 79 घनमीटर सागवान लाकूड व नऊ सागाच्या बल्ली तसेच खाट तयार करण्याचे माचे, कटर मशीन, रंधा मशीन, गिरमिट असा एकूण 28 हजार 564 रुपयांचा मुद्देमाल जप्त ककरीत तो वनपरिक्षेत्र चोपडा आगारात जमा करण्यात आला.
यांनी केली कारवाई
या कार्यवाहीबाबत वनरक्षक बोरअजंटी यांनी गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई यावल उपवनसंरक्षक समीर मुनीर शेख, चोपडा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश व्ही.हाडपे, वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान एम.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वैजापूर वनक्षेत्रातील पथक व येथील सर्व अधिकारी, वनमजूर व वनकर्मचारी वनसेवक सहभागी झाले.

वनविभागाचे जनतेला आवाहन
उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक, चोपडा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर यांनी जनतेला आवाहन केले की, कोणत्याही प्रकारचा वन्यजीव तस्करी अवैध, वृक्षतोड अवैध लाकूड वाहतूक तसेच वनवा व अतिक्रमणाचा गुन्हा आढळून आल्यास आपण एक सुज्ञ नागरीक म्हणुन त्वरित वन विभागाशी संपर्क करावा किंवा महाराष्ट्र शासन वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 यावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाच्या वरिष्ठांच्या वतीने करण्यात आले आहे.
