भुसावळातील दुर्गोत्सव मंडळातील कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू
An activist of Durgotsav Mandal in Bhusawla died due to shock भुसावळ (03 ऑक्टोबर 2024) : शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी भागातील संघर्ष दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते आरास करत असतांना प्रतीक अनिल मिसाळ (23) या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 1 रोजी रात्री 9.30 वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोेद केली आहे.
शॉक लागल्याने मृत्यू
शहरातील द्वारका नगरातील रहिवासी प्रतीक मिसाळ हा युवक रेल्वे नॉर्थ कॉलनीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठी शाळेसमोर असलेल्या संघर्ष दुर्गा मंडळाची आरास मंडळातील कार्यकर्त्यांसह करीत असताना त्यास शॉक लागला. प्रतीक याला शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. ट्रामा केअर सेंटरला विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी प्रतीकचे मामा रत्नाकर गोंविंद तायडे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तपास हवालदार विनोद सपकाळे करीत आहे.

