भुसावळातील 24 वर्षीय महिलेवर अत्याचार : रावेर तालुक्यातील अग्नीवीर जवानाविरोधात गुन्हा


Abuse of 24-year-old woman in Bhusawal : Crime against fireman in Raver taluka भुसावळ (03 ऑक्टोबर 20240) : लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करीत शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय महिलेवर सैन्य दलात अग्नीवीर म्हणून कार्यरत असलेल्या जवानाने अत्याचार केला. ही घटना मे 2024 ते 27 जून 2024 रोजी घडली. याप्रकरणी संशयीत शुभम शैलेश कोळी (थोरगव्हाण, ता.रावेर) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील विविध भागातील लॉजवर केला अत्याचार
24 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत शुभम कोळी याने लग्न करेल, असे आमिष दाखवत शहरातील वरणगाव रोडवरील तसेच शिवाजी कॉम्प्लेक्समधील लॉजवर नेत अत्याचार केला व लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर नकार दिला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडीतेने मंगळवारी तक्रार दिल्यावरून संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !