फैजपूरातील श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा
फैजपूर (05 ऑक्टोबर 2024) : शहरातील श्रीराम मंदिरास महाराष्ट्र शासनाने नुकताचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता दिल्याची माहिती मंदिर संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंदिर समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी मंदिरास शासनाने ‘क’ वर्ग दर्जा मिळावा याबाबत मागणी केली. नुकत्याच जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून याबाबतची यादी प्रसिद्ध झाली आहे.
यामध्ये फैजपूर येथील गावातील श्रीराम मंदिराचा समावेश झाला असून याबाबत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचे व मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वस्त मंडळाने आभार मानले आहे. श्रीराम मंदिर पुरातन असून त्याचा विकास होणे गरजेचे आहे. या मंदिरा शेजारी मंत्री रक्षा खडसे यांनी स्वछता गृहासाठी 10 लाख रुपये मंजूर केले. मंत्री रक्षा खडसे यांचेही आभार अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, विश्वस्त काशीनाथ वारके, चंद्रशेखर चौधरी, मिलिंद वाघूळदे, हेमराज चौधरी, डॉ.गणेश भारंबे, डॉ.उमेश चौधरी, दिलीप पाटील, किशोर कोल्हे, विकास नेमाडे, किरण चौधरी, जितेंद्र भारंबे, नितीन राणे, अजय चौधरी, राजाराम महाजन यांनी आभार मानले.

