हिंगोणा गावातील 32 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या
यावल (06 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील माऊली चौकातील रहिवासी 32 वर्षीय तरुणाने गळफास घेतला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आला. तातडीने या बाबत फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व तरुाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नीळकंठ वासुदेव ठाकूर (32) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
हिंगोणा, ता.यावल येथील माऊली चौकात नीळकंठ वासुदेव ठाकूर हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. या तरुणाने शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात वरील मजल्यावर गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले व तातडीने या तरुणाला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

