पिळोदा बुद्रुक येथे 42 वर्षीय इसमाची आत्महत्या


यावल (07 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील पिळोदा बुद्रुक येथील 42 वर्षीय इसमाने रविवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोकुळ शांताराम देवकर (42) असे मयताचे नाव आहे.

यावल पोलिसात नोंद
देवकर हे आपल्या कुटुंबासह राहत होते. रविवारी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी आले व त्यांना काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात निरज देवकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी, हवालदार विकास सोनवणे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !