रावेरला पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने 11 नागरिक जखमी
रावेर (08 ऑक्टोबर 2024) : शहरातील वेगवेगळ्या भागात पिसाळलेल्या कुत्र्याीं चावा घेतल्याने तब्बल 11 नागरिक जखमी झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका बालकाला जळगावात उपचारासाठी हलवण्यात आले. पालिका प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
यांना घेतला चावा
सोमवारी रावेर शहरातील वेगवेगळ्या भागात यशवंत माळवे (2), शेख रशीद शेख आसीफ (12), समर्थ करतार जाधव (10), आस्मीन खान (6), रेहान फारूक खाटीक (16), शेख हसन शेख अजहर (4.5), यथार्थ पूर्ण नाव माहित नाही ( 6), माही दिलीप सोनार (4.5) हे आठ बालक तसेच नितीन हिराचंद महाजन (34), अलताफ शेख गफार (35), आनंद दत्तात्रय वाणी (50, सर्व राहणार रावेर) हे 11 जण जखमी झाले. जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ.चौधरी, मोहिनी भारंबे, योगीता धीमळ, अन्नु चावरे, सतीष सुर्यवंशी यांनी उपचार केले. जुन्या सावदा रोडवर कुत्र्यांने यशवंत माळवे या बालकाच्या चेहर्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला त्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालय पाठविण्यात आले.

