रावेरात पणन मंत्री अब्दूल सत्तारांच्या निषेधार्थ बाजार समिती बंद


रावेर (08 ऑक्टोबर 2024) : राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ सोमवारी बाजार समिती व सावदा येथील उपबाजार समितीत सभापती, उपसभापती व सचिव,कर्मचारी यांनी बंद पाळून काळ्या फिती लावून निषेधार्य घोषणा दिल्या.

यांचा आंदोलनात सहभाग
गुरुवार, 3 आक्टोबर रोजी निगडी, चिंचवड, पुणे येथे राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत मात्र पणन मंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित होते. बाजार समिती यांच्या प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे, अडचणी, प्रश्न न ऐकता तसेच उपाययोजना व शासनाचे मत न मांडता परिषदेच्या स्थळावरून ते निघून गेले. त्यांनी या परिषदेत बाजार समित्यांच्या प्रश्नांचा विचार केला नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, सचिव गोपाळ महाजन यांच्यासह रावेर समिती, सावदा उपसमिती कार्यालयातील कर्मचारी 23 कर्मचारी, मार्केट यार्डातील आडत व्यापारी, हमाल , मापाडी यांनी कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !