जनमत प्रतिष्ठानतर्फे भुसावळचे गो सेवक रोहित महाले यांचा गौरव
भुसावळ (08 ऑक्टोबर 2024) : भुसावळातील गो सेवक रोहित महाले यांचा जनमत प्रतिष्ठान हेमंत फाउंडेशनतर्फे नुकताच गौश्रव करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
गोमातेबरोबर असंख्य प्राण्यांचे जीव वाचवित उल्लेखनीय कार्य केल्याने तसेच हरविलेल्या बेवारस माणसांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवत त्यांनी सामाजिक सेवेचा वसा कायम ठेवल्याने या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आयोजक पंकज नाले, हेमंत भंगाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





