बोदवड तालुक्यातील अनेक पदाधिकार्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश
मुक्ताईनगर (08 ऑक्टोबर 2024) : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, जामठी, करंजी गावातीलविविध पक्षातील पदाधिकार्यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रवेश घेणार्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यांनी केला प्रवेश
कोल्हाडी येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण राणे, नामदेव लढे, प्रमोद ढाके, बोदवड पंचायत समितीचे माजी सभापती दिपाली राणे यांचे पती जीवन राणे, जामठी येथील गोटू गायकवाड, सुभाष गायकवाड, तुकाराम माठकर, संजय शेळके, शांताराम शिंदे, विठ्ठल पाटील, शे.मोबीन शे.भिकन, हसहाक खाटीक, सागर गायकवाड, तुषार पवार, संग्राम ठाकूर, रवींद्र पारधी, संजय पांचाळ, सागर व्यवहारे, करण पारधी, देवा शिंदे, शुभम भिलारे, दीपक चांदणे, इम्रान शहा, इरफान शहा, अविनाश माळकर, जीत शर्मा, आनंद तेली, अजय शिंदे, समीर शिंदे, सुभाष शेळके, करण उगले, सुरेश साबणे, मयूर पाटील, गौरव गोरे, शुभम पाटील, ओम कचोरे, करंजी येथील माजी सरपंच जानकीराम देवराम पाटील, बापू पिंजारी, गजानन कोळी, गजानन माळी, भास्कर पारधी, सुपडू हरणे, संजय बोंडे, धर्मराज पाटील, गजानन गावंडे, संजय हरणे, सावद्याचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजमल खान आणि मोहम्मद कैफ यांचा समावेश आहे.

न्याय देण्यासाठी कटीबद्ध : अॅड.रोहिणी
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या हितासाठी व नव तरुणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष ंविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुणयांचे हित जपणारा पक्ष आहे. गावातील विकासकामांसाठी आतापर्यंत निधी दिला असून आगामी काळात सुद्धा राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत आबा पाटील, रामदास पाटील, कैलास चौधरी, निलेश पाटील, सतीश पाटील, प्रदीप बडगुजर, शाम सोनवणे, मयुर खेवलकर उपस्थित होते.




