खाकीने उंचावली मान म्हणूनच वाढतोय खात्याचा सन्मान : भुसावळात पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे


The honor of the department is increasing as the neck is raised by khaki: Bhusawal Deputy Superintendent of Police Krishnat Pingle भुसावळ (09 ऑक्टोबर 2024) :  शिस्तीचे खाते म्हणून पोलीस खात्याकडे पाहिले जाते व सर्वसामान्यांच्या पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा असून त्या अपेक्षांची पूर्ती करणे प्रत्येक पोलिसाचे काम आहे. उत्कृष्ट कामे केल्यानेच पोलीस खात्याचा सन्मान वाढत असल्याची भावना भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ विभागातील उत्कृष्ट काम करणार्‍या खाकीतील शिलेदारांना त्यांच्या हस्ते ‘एम्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. यावेळी पिंगळे बोलत होते.

उत्कृष्ट कामांमुळे वाढतोय खात्याचा लौकी
पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले की, पोलीस दलात चांगली कामे केल्यामुळेच पोलीस खात्याचा लौकीक वाढला असून कर्मचारी प्रशंसनेस पात्र आहे.त विभागातील अन्य पोलिसांनी स्तुत्य कामगिरी करून पोलीस विभागाची मान उंचवावी, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. डीवायएसपी कार्यालयात ऑगस्ट आणि सप्टेबर महिन्यात ज्या 10 पोलिसांनी उत्कृष्ठ काम केले त्या कर्मचार्‍यांचा गुन्हे आढावा बैठकीत रोख रक्कम, पुरस्कार व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. कर्मचार्‍यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासह वॉरंट बजावणी, मोटार व्हेईकलच्या केसेसची कारवाई केल्यानंतर त्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.


यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ शहर ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले, सहायक निरीक्षक आसाराम मनोरे आदी उपस्थित होते. याप्रसीं शहर पोलीस ठाण्याचे नेव्हील जॉर्ज बार्टले, संजय तुकाराम ढाकणे, बाजारपेठच्या वनीता संजय बाविस्कर, अन्वर दिलावर शेख, भुसावळ तालुक्याचे जितेंद्र नाना साळुंके, सहाय्यक फौजदार रियाज काझी, नशिराबादचे शरद भालेराव, गणेश गायकवाड, शहर वाहतूक शाखेचे विजय पाटील, शब्बीरखा दगेखा तडवी यांचा गौरव करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !