कोळी जात व वैधता पडताळणीत होणार्या अन्यायाविरोधात फैजपूरात धरणे आंदोलन
फैजपूर (09 ऑक्टोबर 2024) : राज्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी यांच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी होणार्या अन्यायाविरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन प्रांत कार्यालय, फैजपूर येथे करण्यात आले. प्रशासनाला निवेदन देत याकडे दुर्लक्ष झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
फैजपूर प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन
संपूर्ण महाराष्ट्रातील (कोस्टल एरीया वगळून) टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी मल्हार कोळी यांना कोळी नोंदीवरुन अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याचा लेखी अध्यादेश (जीआर) तत्काळ जारी करण्यात यावा, जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सुलभ पद्धतीने मिळावे, टीएसपी क्षेत्रातील कोळी महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी यांना जसे 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरुन जातीचे प्रमाणपत्र व जात-वैधता प्रमाणपत्र देण्यात येते, तोच न्याय ओटीएसपी क्षेत्रातील कोळी महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी यांना देण्यात यावा. वरील सर्व मागण्या न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
जि.प.चे माजी सदस्य प्रभाकरअप्पा सोनवणे, महेश सोनवणे, मंदा सोनवणे, शोभा कोळी, सरीता कोळी, रावेर-यावल तालुक्यातील सर्व कोळी जमातील महिला, पुरुष तसेच कोळी समाज अध्यक्ष दिलीप कोळी, संतोष कोळी, फैजपूर शहरातील कोळी जमातीचे बांधव सहभागी झाले.




