काँग्रेस कमेटी भुसावळ विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी विवेक नरवाडे
Congress Committee Bhusawal Vidhan Sabha Constituency President Vivek Narwade भुसावळ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मिडीया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडीया विभागाच्या भुसावळ विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा चिटणीस विवेक नरवाडे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर अभिनंदनाचा वर्षाव
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजू अंभोरे, योगेंद्र पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, प्रशासन जिल्हा सरचिटणीस जमीलभाई शेख, ज्ञानेश्वर कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष शैलेश बोदोडे, शहराध्यक्ष रवी निकम, वरणगाव शहराध्यक्ष अशपाक काझी, डॉ.सुवर्णा गाडेकर, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर जंजाळे, ज्ञानेश्वर चव्हाण, भगवान मेढे आदींनी विवेक नरवाडे यांचे अभिनंदन केले.





