भुसावळ स्थानकावर उद्यापासून ‘राजधानी’ ला तर बोदवडला मेमूसह अमरावती एक्स्प्रेला थांबा
भुसावळ विभागात चार गाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
Stop at Bhusawal station from tomorrow for ‘Rajdhani’ and Bodwadla for Amravati Express with MEMU. भुसावळ (09 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी गुरुवार, 10 ऑक्टोबर पासून चार गाड्यांना प्रायोगिक तत्वावर विविध स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यात राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर तसेच बोदवड स्थानकावर मेमूसह पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेसला व नांदुरा स्थानकावर पुणे-नागपूर गरीबरथला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी थांब्यासाठी प्रयत्न केले होते.
राजधानी एक्स्प्रेसला आजपासून भुसावळात थांबा
गाडी क्रमांक 22221 मुंबई-हज़रत निज़ामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला 10 ऑक्टोबरपासून भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. रात्री 9.15 वाजता या गाडीचे आगमन होईल व रात्री 9.17 वाजता ती रवाना होईल. गाडी क्रमांक 22222 हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेसला 11 पासून भुसावळात थांबा देण्यात आला असून पहाटे 5.15 वाजता ती येईल व 5.17 वाजता रवाना होईल.

बोदवड स्थानकावर मेमूसह पुणे-अमरावतीला थांबा
गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक स्पेशल मेमूला 10 ऑक्टोबरपासून एका मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. दररोज दुपारी 1.37 मेमू येईल व 1.38 वाजता ती रवाना होईल. गाडी क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा स्पेशल मेमू 11 पासून स्थानकावर थांबेल. रात्री 1.7 वाजता ती येईल व रात्री 1.8 वाजता रवाना होईल.
गाडी क्रमांक 22117 पुणे- अमरावती एसी सुपरफास्ट एक्सप्रेसला 10 पासून थांबा देण्यात आला असून दररोज सकाळी 6:44 वाजता गाडीचे आगमन होईल व 6:45 वाजता ती रवाना होईल तसेच गाडी क्रमांक 22118 अमरावती-पुणे एसी सुपरफास्ट एक्सप्रेस 10 पासून रात्री 9.19 वाजता आल्यानंतर 9.20 वाजता रवाना होईल.
नांदुरा स्थानकावर गरीबरथला थांबा
गाडी क्रमांक 12113 पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेसला 10 पासून थांबा देण्यात आला असून पहाटे 3.39 वाजता तिचे आगमन होईल व 3.40 वाजता ती रवाना होईल. गाडी क्रमांक 12114 नागपूर-पुणे गरीबरथ एक्सप्रेसला 11 पासून थांबा मिळाला असून रात्री 10.49 वाजता ती येईल व 10.50 वाजता रवाना होईल. प्रवाशांनी रेल्वे गाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
