नागरिकांनी कायदा पाळल्यास अनेक प्रश्न सुटतील : सावद्यात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी
Many problems will be solved if citizens obey the law : Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy warns सावदा (13 ऑक्टोंबर 2024) : नागरिकांनी कायदा पाळल्यास अनेक प्रश्न मिटतील व यंत्रणेवरील ताण कमी होईल. पोलीस आपले काम चोख बजावतात मात्र त्यासाठी जनतेचेही सहकार्य हवे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी येथे केले. दसर्याच्या मुहूर्तावर सावदा बस स्थानक परीसरात नवीन पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, राहुल सानप व कर्मचारी उपस्थित होते.



