भुसावळात 14 व 15 रोजी संस्कार भारती रांगोळी वर्कशॉप
प्रतिष्ठा महिला मंडळातर्फें आयोजन : महिलांसह मुलींना सहभागाचे आवाहन
भुसावळ (13 ऑक्टोंबर 2024) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे मुलींसह महिलांसाठी 14 ते 15 ऑक्टोबरदरम्यान रांगोळी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते चार या वेळेत शहरातील संतोषी माता हॉलमध्ये ही कार्यशाळा होईल. महिलांनी सोबत येताना दोन किलो जाड रांगोळी, ब्रश सुपडी, कापड बाऊल किंवा, एक मीटर सुतळी, अर्धा किलो गुलाल चहा गाळणी आदी साहित्य सोबत आणावयचे आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्काचे आवाहन
नाव नोंदणीसाठी अनिता आंबेकर (7304434949 व 09623037418), जयश्री चौधरी (9158823288), मनीषा काकडे (7387187060), सोनल महाजन (9130838468), वैशाली सैतवाल (9511886655), राजश्री बादशाह (8600783976) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.

