पोलिसांनी कर्तव्यासोबतच शरीर निरोगी ठेवावे : पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी
भुसावळ (13 ऑक्टोंबर 2024) : पोलीस कर्मचार्यांनी कर्तव्यासोबतच शरीर सुध्दा फिट ठेवावे, परिवारातील सदस्यांनी आरोग्याची काळजी घेत व्यायाम करावा आणि आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहन पोलिीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. शहरातील पोलीस वसाहतीमध्ये शनिवारी जीमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. पोलीस वसाहतीमध्ये शनिवारी पोलीस प्रशासनातर्फे जीमचे (व्यायाम शाळा) उद्घाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे आदी उपस्थित होते. जीम उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अपर अधीक्षक नखाते, आमदार संजय सावकारे यांनी मनोगत व्यक्त केले.

काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
जीमची आतून पाहणी करण्यात आली तसेच उपकरणांची पाहणी करण्यात आली व काही उपकरणे मान्यवरांनी हाताळून पाहिली. पोलीस वसाहतीमधील रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार निधीतून हे काम केले जात आहे. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले. यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
