मुंबईकरांना शिंदे सरकारची मोठी भेट : लहान वाहनांना टोल माफी ; जाणून घ्या मंत्री मंडळ निर्णय
Shinde government’s big gift to Mumbaikars : toll waiver for small vehicles ; Know the Cabinet decision मुंबई (14 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 24 तासात जाहीर होण्याची शक्यता पाहता सोमवारी मंत्री मंडळाची अखेरची बैठक असल्याने या बैठकीतील निर्णयाकडे जनतेचे लक्ष लागले होते. शिंदे सरकारने मुंबईत प्रवेश करणार्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देवून मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
लहान वाहनधारकांना मोठा दिलासा
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही.

- मंत्री मंडळ बैठकीत झाले हे निर्णय
आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर डव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
वैजापूरच्या शनीदेवगाव बंधार्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार
पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे (वैद्यकीय शिक्षण)
खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
मुंबईतल्या पाच5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ
आगरी समाजासाठी महामंडळ
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर




