महाविकास आघाडीत 200 जागांवर एकमत : शरद पवार म्हणाले ; मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर !


मुंबई (17 ऑक्टोबर 2024) : महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांसाठी शुक्रवारी बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील व निर्णय घेवून आम्हाला सांगतील. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे.

हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्रात परिणाम नाही
शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत जसा पिपाणीचा फटका बसला तसा फटका यावेळी बसेल का ? असा प्रश्न केा असता ते म्हणाले की, लोकसभेला जे चित्र होते ते स्पष्ट झालेले नव्हते. आता आम्ही स्पष्ट केले आहे. हरियाणात भाजप सरकार होते ते कायम राहिले. जम्मू-काश्मीरमध्ये तसे झाले नाही पण त्या निवडणुकीचा महाष्ट्रात परिणाम येथे होईल, असे वाटत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत काही नेते दावा करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले की, मनोज जरांगे यांचा निवडणूक लढण्याचा ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल.

जागा निवडून आणण्याची जवाबदारी : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असे उध्दव ठाकरे यांचा आग्रह आहे पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच. जास्तीत-जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही. आमच्याकडे तरुण चेहरे आहेत, असे म्हणत त्यांनी यावेळी नव्या चेहर्‍यांना संधी देणार हे स्पष्ट केले आहे.

 


कॉपी करू नका.