भाजपाची पहिली यादी जाहीर : भुसावळात आमदार सावकारे, जळगावात आमदार राजूमामा तर रावेरात अमोल जावळे उमेदवार

भाजपाची पहिली यादी जाहीर : भुसावळात आमदार सावकारे, जळगावात आमदार राजूमामा तर रावेरात अमोल जावळे उमेदवार


भुसावळ ः (20 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली असून त्यात 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भुसावळात भाजपाचे आमदार संजय सावकारे तर जळगावात आमदार राजूमामा भोळे तर रावेरात अमोल जावळे यांना संधी देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आणली होती व या नावांवर आता फायनली शिक्कामोर्तब झाल्याने वृत्त खरे ठरले आहे.

जळगावात आमदार भोळे यांना पुन्हा उमेदवारी
जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा एकदा जळगाव शहर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळेल? याकडे लक्ष लागून होते परंतु भाजपने पहिल्या 99 उमेदवारांच्या नावात आमदार राजूमामा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

भुसावळात आमदार संजय सावकारेच उमेदवार
सलग तीन टर्म आमदार राहिलेले आमदार संजय सावकारे यंदा विजयाच्या चौकारासाठी रिंगणात उतरले असून त्यांनाच भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. भाजपाचा उमेदवार जाहीर झाला असलातरी महाविकास आघाडीत मात्र अद्यापही उमेदवारीवर खल सुरू आहे.

रावेरात अमोल जावळेंना संधी
रावेर विधानसभेतून स्व.हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना तिकीट मिळेल व पहिल्याच यादीत त्यांनाही स्थान असेल याबाबत ब्रेकींग महाराष्ट्रने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. स्व.हरिभाऊ जावळे यांचे पक्षासाठी असलेले योगदान व अमोल जावळे यांना लोकसभेत तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी दाखवलेल्या संयमाची पक्ष नेतृत्वाने दखल घेतली आहे.

  • खान्देशात या उमेदवारांना संधी
  • भुसावळ- आमदार संजय सावकारे
  • जळगाव शहर- आमदार राजू मामा भोळे
  • चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण
  • जामनेर- गिरीश महाजन
  • रावेर- अमोल जावळे
  • नंदुरबार- विजयकुमार गावीत
  • शहादा- राजेश पाडवी
  • धुळे- अनुप अग्रवाल
  • शिंदखेडा- जयकुमार
  • शिरपूर- काशीराम पावरा

कॉपी करू नका.