आज शिंदे गट शिवसेनेची पहिली यादी जाहीर करणार !


मुंबई (21 ऑक्टोबर 2024) : राज्य विधानसभा निवडणूक जाहीर होताच रविवार, 20 रोजी भाजपाने पहिली यादी जारी केली तर आज सोमवारी शिंदे गट शिवसेना आपल्या उमेदवारांची पहिली यादी जारी करणार आहे.

महाविकास आघाडीत वाद थांबेना
महाविकास आघाडीमध्ये वाद टोकाला गेला आहे. विदर्भात काँग्रेस शिवसेनेला जागा सोडत नसल्याने ठाकरे आणि पटोलेंमध्ये खुट्ट झाले आहे. हा वाद दिल्लीपर्यंत गेला असून राज्यातील नेत्यांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन-चार जागांसाठी मविआत तणाव निर्माण झाला आहे.

शिंदे गटाची आज यादी समोर येणार
शिंदे गटही सोमवारी पहिली यादी जाहीर करणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत ही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. भाजपाने मोठा भाऊ असल्याने आपल्या जागा सोडविल्या आहेत. परंतू, काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे अडलेले आहे. त्यातच आठवले व इतर मित्रपक्षांनीही जागा मागितल्याने काही जागांवर पेच निर्माण झाला आहे.


कॉपी करू नका.