परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी जाहीर : रावेरच्या आखाड्यात अनिल चौधरींना उमेदवारी


भुसावळ : (21 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापला आहे. ‘परिवर्तन महाशक्ती’ ने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत रावेर विधानसभेसाठी अनिल छबीलदास चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रभारी असलेल्या अनिल चौधरींनी आतापर्यंत रावेर तालुका पिंजून काढला आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला.

असे आहेत पहिल्या यादीतील उमेदवार
1. अचलपूर- बच्चू कडू – प्रहार
2. रावेर- अनिल चौधरी – प्रहार
3. चांदवड- गणेश निंबाळकर – प्रहार
4. देवलूर- सुभाष साबणे – प्रहार
5. ऐरोली- अंकुश कदम – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
6. हदगाव हिमायतनगर- माधव देवसरकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
7. हिंगोली- गोविंदराव भवर – महाराष्ट्र राज्य समिती
8. राजुरा- वामनराव चटप – स्वतंत्र भारत पक्ष

परिवर्तन महाशक्तीची स्थाना
महाविकास आघाडी व महायुती मध्ये राज्यात प्रमुख लढत असतांना तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्तीची स्थापना करण्यात आली आहे. यात आठ उमेदवार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (प्रमुख), प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी एकत्रीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. सांगली जिल्हयातील शिरोळ व मिरज या दोन मतदार संघात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटेचे उमेदवार उद्या जाहीर करण्यात येतील.


कॉपी करू नका.