विधानसभा निवडणूक रणसंग्राम : उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया
भुसावळ (21 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार, 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने इच्छुकांची धांदल वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्धार केलेल्यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरून घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत पोलीस बंदोबस्तही असेल.
29 पर्यंत भरता याणार अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम मुदत 29 ऑक्टोबर असून रविवारी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळालेले पहिल्या टप्प्यातच अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचीही उमेदवारांची यादी आज वा उद्या जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.





