चाळीसगाव विधानसभेसाठी उबाठा गटाकडून उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर !


चाळीसगाव (22 ऑक्टोबर 2024) : महाविकास आघाडीतून जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतरही उमेदवारांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती मात्र चाळीसगावातून माजी खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. सूत्रानुसार पाटील यांना एबी फार्मही देण्यात आला असून त्यांची लढत आता भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी होणार आहे.

चाळीसगावचा तिढा सुटा
शिवसेना-उबाठा पक्षाने या आधीच पाचोरा मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर केली तर चाळीसगावात महाविकास आघाडीतून ही जागा नेमकी कुणाला सुटणार? यावरून खल सुरू असताना उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. टीव्ही नाईनने या संदर्भात वृत्त दिले आहे. उन्मेश पाटील यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म देण्यात आला असून त्यांच्या उमेदवारीबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. या मतदारसंघातून आधीच मंगेश चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. परिणामी आता येथून मंगेश चव्हाण विरूध्द उन्मेष पाटील अशी सरळ लढत पहायला मिळणार आहे.


कॉपी करू नका.