मुख्यमंत्र्यांनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन : 25 रोजी अर्ज भरणार !
मुंंबई (23 ऑक्टोबर 2024) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पहाटे गुवाहाटीलतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले असून ते शुक्रवार, 25 रोजी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अडीच वर्षांपूर्वी केली बंडखोरी
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळी चूल मांडली होती. त्यावेळी ते आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम सुरतला व त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. तेथूनच त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही कामाख्या देवीच्या आशीर्वादाने सत्ता स्थापन करत असल्याचा दावा केला होता. विशेषतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही त्यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटी गाठून सपत्नीक कामाख्या देवीचे दर्शन घेतले.





