दोन हजारांची लाच भोवली : सातपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह हवालदार जाळ्यात
Bribe of Rs 2000 : Constable arrested along with Assistant Sub-Inspector of Satpur Police Station सातपूर (24 ऑक्टोबर 2024) : बिल्डरकरून धनादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज सोनू गावीत (57) व हवालदार कांतीलाल रघुनाथ गायकवाड (41) यांना नाशिक एसीबीने अटक केली. या कारवाईने पोलीस दलातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
51 वर्षीय तक्रारदार यांचनी सहा वर्षांपूर्वी सातपुर येथील सम्राट बिल्डर यांच्याकडे अपना घर स्कीम नं.1. आनंदवल्ली शिवार, नाशिक येथे टू बीएचके प्लॅट 23 लाख 50 हजारात बुक केला व त्यापोटी संचालक गुप्ता यांचे बँक अकाउंटवर 21 हजार रुपये धनादेशाद्वारे दिले मात्र सहा वर्ष होवूनही रक्कम मिळाली नाही अथवा फ्लॅटचे कागदपत्र न मिळाल्याने त्यांनी सातपूर पोलिसात तक्रार दिली. वरील संशयीतांकडे या अर्जाची चौकशी दिल्यानंतर त्यांनी दहा दिवसांपूर्वी तक्रारदार व सम्राट बिल्डर प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवून आणत तक्रारदार यांना सम्राट बिल्डरचे प्रतिनिधी यांनी 21 हजारांचा चेक दिला व काम करून दिल्याच्या मोबदल्यात आम्हाला बक्षीस हवे म्हणून तक्रारदाराने दोन हजार दिले मात्र त्यानंतर पुन्हा 23 रोजी आरोपी गावित यांनी पुन्हा पैशाची मागणी केली व तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. हवालदाराने अधिकार्यायंच्या समक्ष संमतीने दोन हजाांची लाच घेतल्याने दोघांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक एकनाथ गं.पाटील, हवालदार सुनील पवार, अविनाश पवार, दिनेश खैरनार आदींनी हा सापळा यशस्वी केला.




