जळगावकरांना आता बदल हवा ! : अपक्ष उमेदवारी दाखल करणार ! : माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे


जळगाव (25 ऑक्टोबर 2024) : जळगावकरांना आता बदलाची अपेक्षा असून गेल्या दहा वर्षात शहराचा कुठल्याही प्रकारे विकास झाला नसल्याने जळगाव शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती गुरुवारी भाजपचे माजी उपमाहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय
डॉ.सोनवणे म्हणाले की, मी गेल्या 30 वर्षांपासून भाजप पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, मी जळगाव शहराच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहिलो आहे. गेल्या 10 वर्षांपासून जळगाव शहराचा विकास झाला नाही यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. जळगावकरांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी व शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी मी जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून इच्छुक होतो आणि जळगावकरानांदेखील बदल हवा असतांना मला मात्र या ठिकाणी नाकारले गेले आहे. त्यामुळे मी जळगाव शहराच्या विकासाठी जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे डॉ.अश्विन सोनवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. जळगाव शहर विधानसभेत भाजपची डोकेदुःखी वाढली असून डॉ.सोनवणे यांच्या पवित्र्यानंतर विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांना आता मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे जाणकारांचे मत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !