धुळ्यात 22 लाखांचा गुटखा जप्त


आयशरसह दोघा चालकांना अटक : चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

धुळे : गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव रोड पोलिसांनी संशय असलेल्या आयशरची तपासणी करीत 22 लाखांच्या गुटख्यासह दोघा आरोपींना मंगळवारी अटक केली. वाहनचालक रवी परबत खरते (25, रा.रानगाव डेम, ता.टिकरी, जि.बडवाणी), सहचालक परबत नथ्थू वास्कले (45, रा.कोईडी, ता.टिकरी, जि.बडवाणी) यांना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
इंदोर येथून धुळेमार्गे मालेगावकडे आयशरमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. आयशर (एम.पी.09 जी.ई.1294) चाळीसगाव चौफुलीवर अडवल्यानंतर त्यात विमल पान मसाला व वी-1 तंबाखुचा एकूण 22 लाखांचा मालासह आठ लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधीक्षक राजु भुजबळ व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश मुंढे, पोलिस उपनिरीक्षक योगेश दिकले, प्रेमराज पाटील, अजीज शेख, सुशील शेंडे, मुख्तार शहा, नरेंद्र माळी, संदीप कढरे आदींनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !