संगमनेरमध्ये विखे-थोरात वादातून दगडफेक व जाळपोळ

जयश्री थोरातांबद्दल विखे समर्थकांनी आक्षेपार्ह वक्तव्य करताच महिलांनी सुजय यांची सभा उधळली


Stone pelting and arson in Sangamner संगमनेर (26 ऑक्टोबर 2024) : वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताच गावातील संतप्त महिलांनी सभा उधळली. त्यानंतर प्रचंड गोंधळ उडून जमावाने दगडफेक करीत जाळपोळ केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे घडली. माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केल्याने हा धक्कादायक प्रकार घडला.

विखेंची सभा गुंडाळली
वसंतराव देशमुख यांनी महिलांचा अत्यंत अवमानकारक उल्लेख करून समस्त महिला भगिनींचा अपमान केल्याचा आरोप झाल्यानंतर वातावरण तापले व धांदरफळ गावांमधील अनेक महिला एकत्र आल्या व त्यांनी सभास्थळी धाव घेतली. सुजय विखेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. याप्रसंगी विखे यांनी भाषण आटोपते घेतले तसेच देशमुख यांनाही भाषण संपवण्यास सांगितले. सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपवून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे आणि देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ उडाला.


सभेत गोंधळ घातला म्हणून विखे समर्थक संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमले होते.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !