चाळीसगाव, बोदवड व रावेरचे प्लॅटफार्म तिकीट आता 30 रुपये


भुसावळ : जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 14 रेल्वे स्थानकांचे तिकीट दर दहा रुपयांवरून 30 रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीच भुसावळसह आठ रेल्वे स्थानकांचे तिकीट दहा रुपयांवरून पन्नास रुपये करण्यात आले होते. रेल्वेच्या या निर्णयामुळे अनावश्यक गर्दीला आळादेखील घातला जाणार आहे.

या स्थानकावर प्लॅटफार्मचे तिकीट 30 रुपये
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह लासलगाव, निफाड, नांदगाव, चाळीसगाव, धुळे, पाचोरा, बोदवड, मलकापूर, नांदुरा, मुर्तिजापूर, रावेर, बर्‍हाणपूर तसेच नेपानगर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मचे तिकीट आता 18 मार्च ते 15 एप्रिदरम्यान 30 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !