पालकमंत्र्यांचा खंदा समर्थक हरपला : आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू
पाळधी (29 ऑक्टोबर 2024) : अतिशय शांत व संयमी असलेले तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे संपूर्ण काम पाहणारे तसेच जीपीएस मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा अनिल आत्माराम महाजन यांचे आजाराने निधन झाल्याने पाळधी परिसरात शोककळा पसरली आहे.
पालकमंत्र्यांचे जवळील कार्यकर्ते
अतिशय सर्वसाधारण परिस्थिती असलेले अनिल महाजन हे प्रतापराव पाटील यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते. मंत्री गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना शारीरिक त्रास जानवू लागला त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी त्यांना तत्काळ जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तत्काळ मुंबई येथे रवाना होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना मुंबई येथे नेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली मात्र त्यांच्या रक्तात ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. जीपीएस मित्र परिवाराचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांचा परिवारासह मित्र परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





