एरंडोल मतदारसंघात प्रचंड शक्ती प्रदर्शनानंतर महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज
एरंडोल (30 ऑक्टोबर 2024) : ढोल-ताशांचा गजर करीत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एरंडोल-पारोळा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी मंगळवार, 29 रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला.
रॅलीत यांचा समावेश
रॅलीत खासदार स्मिता वाघ, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे, मृणाली पाटील, माजी सभापती रेखा चौधरी यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारांना विनम्र अभिवादन
सर्वप्रथम शहरातील प्रमुख चौकातून अभिवादन रॅली काढण्यात आली. मंगळवारी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, क्रांतिज्योती महात्मा फुले यांचा पुतळा, अमळनेर दरवाजा, श्री विठ्ठल मंदीर – पांडव वाडा, भोई गल्ली, जे.डी.सी.सी. बँक, भगवा चौक, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, श्री मरिमाता मंदीर, आर.टी. काबरे विद्यालय, धरणगांव चौफुली, बसस्थानक, वैष्णवी हॉटेलमार्गे निघालेली रॅली पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.
अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
महायुतीची जाहीर सभा पार झााल्यानंतर यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, भाजपा संघटनमंत्री किशोर काळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांनी आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित
यावेळी शिवसेना – भाजपा- राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे व संघटनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हाध्यक्ष, महायुतीचे समन्वयक, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विधानसभा प्रमुख, तालुकाप्रमुख, तालुकाध्यक्ष, उपतालुकाप्रमुख, उपतालुकाध्यक्ष, शहरप्रमुख, शहराध्यक्ष, उपशहरप्रमुख, उपशहराध्यक्ष, शहरसंघटक, तालुकासंघटक, जिल्हापरिषद, जिल्हा बँक, जिल्हा दुध संघ, पंचायत समिती, नगरपरिषद, बाजार समिती, शेतकी संघ, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शिक्षण संस्था यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना, भाजपा- राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.