जळगाव विधानसभेची जागा हमखास जिंकणार ! : शिवसेना उपनेते संजय सावंत
जळगाव शहराचे प्रचारप्रमुख म्हणून स्वीकारली जवाबदारी : 15 दिवस मुक्कामी
जळगाव (1 नोव्हेंबर 2024) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून शिवसेना उमनेते व संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. ते सलग पंधरा दिवस शहरात मुक्काम करणार असून प्रचाराचे नियोजन आदी बाबी हाताळणार आहेत.
जळगावची जागा हमखास जिंकणार
आम्ही जळगाव शहराची जागा हमखास जिंकणार आहोत. पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शहरात एकजीनसीपणाने काम करीत आहे. या निवडणुकीत परिवर्तनाची संधी जनतेला उपलब्ध झाली आहे, असे श्री सावंत यावेळी म्हणाले. या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.





