महायुतीने राजकारणाची खालची पातळी गाठली ! अजित पवारांच्या त्या विधानावरून नाना पटोले संतापले
मुंबई (2 नोव्हेंबर 2024) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकेचे बाण चालवले आहेत. आज आबा हयात नाही त्यामुळे त्यांच्याविषयी अशा पद्धतीने चर्चा करणे वा बोलणे योग्य नाही. महायुतीचे राजकारण किती खालच्या पातळीवर गेलेले आहे, हे यावरून दिसून येते. सत्तेसाठी काही पण असे एकंदरीत चित्र आहे.
अजित पवार वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले !
नाना पटोले म्हणाले की, आज आबा (आर.आर. पाटील) हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी अशा पद्धतीने चर्चा करणे योग्य नाही. पण अजित पवार मोदींच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यामुळे धुतल्या गेलेत हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे घेवून आले होते. त्यांना चक्की पिसायला लावीन असे सांगत होते. मग भ्रष्टाचार झाला की नाही हे त्यांना माहिती नाही काय? मोदींच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यामुळे अजित पवार धुतले गेले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला कलंक लावण्याचा काम झाले आहे. त्याबद्दलचे प्रश्न आता जनताच निवडणुकीत विचारणार आहे.