तर बंडखोरांना भाजपा पक्षाचे दरवाजे कायमचे बंद ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा


नागपूर (3 नोव्हेंबर 2024) : सोमवारी जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात माध्यमांशी बोलताना सांगितले. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका करणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यावर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. खरगे यांनी लाडकी बहिण, शेतकर्‍यांची वीज बिलमाफी या योजना चुकीच्या असून त्या सरकारला दिवाळखोरीकडे नेतील असे विधान करून आपले महिला व शेतकरीविरोधी आकस उघड केला आहे. काँग्रेसने लाडकी बहिण योजनेविरोधातच षडयंत्र केल्याचा आरोप बावनकुळे यांनी लावला.

गोपाळ शेट्टी भाजपाला साथ देतील
अपक्ष अर्ज भरणार्‍यांमध्ये मुंबईतील गोपाळ शेट्टी यांचेदेखील नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले ते उद्यापर्यंत निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. आर्वी मतदारसंघातून दादाराव केचे अर्ज मागे घेण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !