नरडाण्यात दोन लाख 31 हजारांच्या गुटख्यासह आरोपी जाळ्यात


नरडाणा : गावातील एका किराणा व्यापार्‍याकडे प्रतिबंधीत गुटखा-पानमसाला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नरडाणा पोलिसांनी केलेल्या कारवाई दोन लाख 31 हजार रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला, सागर व तानसेन आदी प्रकारचा गुटखा व पानमसाल्याचा साठा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला. पांडुरंग भास्कर पाटील (गावदरवाज्याजवळ, नरडाणा) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाइृ पालिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, शिरपूर उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरू, घनश्याम मोरे, प्रकाश माळी, अरुण चव्हाण, रघुनाथ शिंदे, किसन पवार, सचिन सोनवणे, संजय महाले, चंद्रप्रकाश कांबळे आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !