मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार : अटकेतील आरोपींची संख्या पोहोचली तीनवर


जळगाव (7 नोव्हेंबर 2024) : मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जळगावात पत्रकार परिषदेत दिली. दीपक दादाराव शेजोळे (22, रा.येवती, ता.बोदवड), आयुष उर्फ चिकू गणेश पालवे (19), विकी ईश्वर गुरचळ (25, नाडगाव, ता.बोदवड) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गोळीबारामागे राजकीय पार्श्वभूमी नाही
अटकेतील संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली शाईन मोटरसायकल, गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या घटनेत कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारख, 5 रोजी विनोद सोनवणे बसलेल्या गाडीवर प्रचारादरम्यान बोदवड मलकापूर रस्त्यावरील राजूर गावाजवळ दुपारी पावणेतीनच्या सुमारास तीन अज्ञात इसम गोळीबार करून पसार झाले होते.


संशयीतांना पाच दिवसांची कोठडी
या प्रकरणी सोनवणे यांचे वाहन चालक अजय भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात गुन्हा दाखल आहे. होता. संशयीताना बोदवड न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड पोलीस निरीक्षक अरविंद भोळे, उपनिरीक्षक सुजीत पाटील, उपनिरीक्षक सुधाकर शेजाळे, पोलीस नाईक शशिकांत शिंदे तपास करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !