जळगावात विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उपोषण
जळगाव : विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना 40 चे पासिंग व 40 मार्कांचेच अॅग्रीगेट पासिंग लागू करावे, ए.टी.के.टी. ची सवलत तीन ऐवजी चार विषयांसाठी करण्यात यावे, 2018-19 सालच्या निकालात विद्या परीषद सभेचा ठराव लागू करावा, कुलगुरुंनी तोंडी आश्वासन दिल्याप्रमाणे 40-40 गुणांचा पासिंगचा ठराव सगळ्यांना लागू करावा आदी मागण्यांसाठी जळगाव विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून उपोषण छेडले आहे. मागण्यांसंदर्भात अनेकदा कुलगुरुंना भेटून माहिती देण्यात आली, कुलगुरुंनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही यंदाच्या निकालात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने उपोषण छेडण्यात आल्याचे उपोषणार्थी म्हणाले.
उपोषणार्थींना अनेकांचा पाठिंबा
उपोषणार्थींची जिल्हा परीषद सदस्य डॉ.हर्षल माने, साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी, शोभा हंडोरे, भारती म्हस्के तसेच प्रताप पाटील आदींनी भेट उपोषणार्थी विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतल्या.